10th Board Exam:दहावीच्या बोर्डाचा पेपर अवघ्या दहाच मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल!!

10th Board Exam 2024

10th Board Exam:दहावीच्या बोर्डाचा पेपर अवघ्या दहाच मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल!!

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा(SSC Board Exam 2024) सुरू आहेत आणि सोशल मीडियावर(WhatsApp)अवघ्या दहाच मिनिटांमध्ये दहावीच्या बोर्डाचा पेपर व्हायरल झालेला आहे. दहावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका अवघ्या दहाच मिनिटांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हे प्रकरण यवतमाळ मधील पाटनबोरी येथे घडलं आहे. या घटनेमुळे परीक्षा सुरू असतानाच खळबळ उडाली आहे.पुढील पेपरही फुटणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.यासाठी उपाययोजना काय?? पेपर कसा फुटला?

चला तर बघुयात पेपर कसा फुटला??

यवतमाळ जिल्ह्यातील पणबोरी येथे पेपर फुटला.
(Cheating In 10th Exam Yavatmal) बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या मराठी विषयाचा पेपर पाणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावर दहा मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणामुळे पुढीलही पेपर्स फुटणार याची शक्यता दर्शवली जात आहे
पेपर फुटल्याची माहिती भरारी पथकाला मिळताच पथकाने केंद्रावर धाव घेत उपस्थितांची चौकशी केली.

दहावी बोर्डाचा गणिताचा पेपर फुटला इथे बघा सविस्तर माहिती

पोलिसात तक्रार दाखल

परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी विविध पथके गठीत करण्यात आली आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. तरीही पेपर व्हायरल झाल्याने पांढरकवडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुढील काय?

राज्यात ५ हजार ८६ केंद्रावर दहावीची परीक्षा(SSC Board Exam 2024) पार पडत आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यंदा तब्बल १६ लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे एसएससी बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

SSC Board Exam 2024News:

हे प्रकरण अनेक प्रश्न उपस्थित करते:

पेपर कसा फुटला?
यामागे कोण आहे?
या प्रकरणात कोणावर कारवाई होणार?
परीक्षेची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यावर काय परिणाम होईल?

हे प्रकरण शिक्षण विभागासाठी मोठे आव्हान आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Leave a Comment