12th Board Exam News 2024:’स्कॉड मॅडम’ ने केली बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या ६५ विद्यार्थ्यावर कारवाई!मुलीने लपविली कपड्यात कॉपी!!

12th Board Exam News 2024

12th Board Exam News 2024:’स्कॉड मॅडम’ ने केली बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या ६५ विद्यार्थ्यावर कारवाई!मुलीने लपविली कपड्यात कॉपी!!

मंगळवेढा, माळशिरस आणि कुर्डुवाडी येथील एका विद्यार्थ्यावर कॉपीप्रकरणी कारवाई.’स्कॉड मॅडम’ म्हणून ओळख असलेल्या उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केली.गोंदिया येथे कार्यरत असताना त्यांनी एकाच वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ६५ विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती.

बारावीच्या परीक्षेत २ दिवसात ३ विद्यार्थी पकडले.माध्यमिक शिक्षण कार्यालयातील ‘स्कॉड मॅडम’चा दणका. कपड्यात अन्‌ ओढणीत लपविलेली कॉपी शोधून काढलीच.

बातमी सविस्तर:

बारावीच्या परीक्षेत बुधवारी आणि गुरुवारी दोन दिवसांत तीन विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय केंद्रातील एका विद्यार्थिनीने ओढणीत पिन लावून ठेवलेली कॉपी भरारी पथकाने शोधून काढली. गुरुवारी विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र विषयाच्या पेपरवेळी माळशिरसमधील पिराळे केंद्रावर व कुर्डुवाडीतील भिसे कॉलेजवरील प्रत्येकी एका विद्यार्थिनीस कॉपी करताना भरारी पथकाने पकडले. भिसे कॉलेजवरील मुलीने कपड्यात कॉपी लपविली होती.

10th Board Exam Viral News 2024: विद्यार्थिनीची उत्तर पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल प्रेम पटकन होत नाही,अभ्यास केला नाही!मला पास करा!

या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात ४६ भरारी पथके नेमली आहेत. प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना त्यांची अंगझडती घेतली जाते. तरीही काही विद्यार्थी नकळतपणे कॉपी करण्याचा प्रयत्न करतात.

दहावीच्या परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत. जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर ६५ हजार ७४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने भयमुक्त वातावरणात पेपर लिहावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.

‘स्कॉड मॅडम’चा दणका:

उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांना ‘स्कॉड मॅडम’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी या परीक्षेत दोन विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई केली आहे. गोंदिया येथे कार्यरत असताना त्यांनी एकाच वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ६५ विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती.

12th Board Exam News 2024 FAQs:

1.बारावीच्या परीक्षेत किती विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले?

उत्तर :- या वर्षी बारावीच्या परीक्षेत दोन दिवसांत तीन विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले.

2.कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांवर काय कारवाई होईल?

कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल बोर्डाला पाठवण्यात आला आहे. बोर्ड त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल.

3.परीक्षा केंद्रांवर कॉपी रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत?

परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची अंगझडती घेतली जाते. तसेच, प्रत्येक केंद्रावर भरारी पथक तैनात केले आह

जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

12th Board Exam News 2024

Leave a Comment