5वी ते 8वी वर्गातील विध्यार्थ्यांना पास होणे बंधनकारक !! राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी! सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी लागू होणार नवीन नियम!

शालेय विभागाचा नवीन निर्णय:राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एक फार फार महत्त्वाची बातमी आहे.आता शिक्षण विभागाने राज्यातील पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा नवीन निर्णय घेतला आहे. आता जर वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यांला त्याच वर्गात ठेवले जाईल.

बघुयात शालेय विभागाचा नवीन निर्णय:

आतापर्यंत चालत आलेल्या शिक्षण हक्क १६ कायद्यानुसार,
कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही.आणि शाळेतूनही काढता येणार नाही. असा हा कायदा पूर्वी होता परंतु यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. या कायद्यामध्ये करण्यात आलेला बदल म्हणजेच सरकारने कलम १६ मध्ये सुधारणा केली आणि पाचवी आणि आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केली आहे. आणि जर या वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी नापास झाल्यास त्यांना अतिरिक्त मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि परीक्षेच्या निकालानंतर दोन महिन्यांत पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. जर या पुनर्परीक्षेतही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अशा विद्यार्थ्यांना पाचवी किंवा आठवीच्या वर्गात ठेवले जाणार नाही.

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या:

राज्यातील सर्व पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. आणि या कार्यपद्धतीनुसार पाचवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयासाठी 50 गुणांची तर आठवीला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाची 60 गुणांची परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात येणार आहे. याकडे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा:

या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि जे विद्यार्थी या परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण होतील त्यांना जूनमध्ये पुनर्परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. आणि जर विद्यार्थी पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झालेत त्यांच्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे? हा प्रश्न सर्वांना पडणार तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात ठेवण्यात येणार आहे. आणि या कार्यापद्धतीची अंमलबजावणी या यावर्षीपासून करण्यात येणार आहे.

चला तर जाऊया माहिती वर्गोन्नतीसाठच्या निकषांविषयी:

पाचवीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयामध्ये किमान 18 गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे तर आठवीच्या विद्यार्थ्यांनी 21 गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे.गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण. जर विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असतील तर सवलतीची किमान दहा गुणांनी अनुत्तीर्ण झाल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव परीक्षेला गैरहजर असल्यास पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment