Board Exam Strick Rules: बोर्डाच्या परीक्षेत 10वी व 12वीचे `है’ विद्यार्थी 5 वर्षासाठी होणार निलंबित! परीक्षेला बसू शकणार नाहीत शिक्षण मंत्रीची मोठी घोषणा

Board Exam Strick Rules: 10th and 12th `This’ students will be suspended for 5 years! will not be able to appear for the exam, the education minister’s big announcement

BOARD EXAM’S STRICK RULES 2023MAHARASHTRA

Board Exam’s New Rules:- Board exam rule : विद्यार्थी मित्रांनो यावर्षी आपल्या सरकारने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या संदर्भात बोर्डाने खूपच महत्त्वाची सूचना तुम्हाला पाठवली आहे• यंदाच्या वर्षी 10 वी तसेच 12वीच्या परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे खुपचं मजबूत करण्यात आलेली आहेत. उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर पूर्णपणें परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या बोर्डाच्या परीक्षेत कॉपी करणारे आता सुरक्षित नाहीत.

⚫सरकार नियम बघा खाली

राज्य सरकारने १० वी आणि १२ वी परीक्षांबाबत एक महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियम कडक करण्यात आले आहेत.

उमेदवाराने परीक्षेचा पेपर चोरल्यास, मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून परीक्षेचा पेपर घेतला, विकत घेतला किंवा पाठवला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील पाच परीक्षांसाठी विद्यार्थ्याचे निलंबन करण्यात येणार आहे. यासोबतच उमेदवारावर फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे.

अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवणी, आलेख, नकाशे, बोर्डाच्या लॉग टेबल्सचा अनधिकृत ताबा आणि वापर केल्यास विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी अपात्र ठरतील. पुढील 5 वर्ष परीक्षांसाठी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची चोरी, खरेदी, विक्री आणि खरेदी तसेच मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर प्रसारित करण्यास मनाई असेल. उमेदवारावर फौजदारी प्रकारे गुन्हा दाखल केला जाईल.

⚫ यंदाच्या वर्षी दहावी-बारावीसाठी कठोर नियमावली

उपकरणे वापरणे, मंडळाने मान्यता न दिलेले किंवा प्रतिबंधित केलेले साहित्य, परीक्षा हॉलमध्ये ठेवणे. चिथावणीखोर, न वाचता येणारी भाषा वापरणे, अपशब्द लिहिणे किंवा धमकी देणे, उत्तर पत्रात बैठक क्रमांक, फोन नंबर, रोमिंग क्रमांक देऊन संपर्क साधण्याची विनंती करणे. विषयाशी संबंधित नसलेला इतर मजकूर लिहिणे, परीक्षा सुरू असताना, हेतूविना उत्तराबाबत इतर परीक्षार्थीशी संपर्क साधणे, एकमेकांकडे पाहून लिहिणे, इतर परीक्षार्थीना तोंडी उत्तरे सांगणे या सर्व गोष्टींवर बंदी असेल. अशा परिस्थितीत दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील पाच वर्षे परीक्षेसाठी विध्यार्थ्यांना गमवावी लागतील.

12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी पासून सविस्तर 👇

12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च आणि 10 वीची परीक्षा 2 ते 25 मार्च दरम्यान होणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेची पूर्ण तयारी केलेली असली तरी गेल्या दोन वर्षांत झालेल्या परीक्षांचे अनेक नियम यंदा बदलण्यात आलेले आहेत. या सोबतच फसवणूक मुक्त {copy free} परीक्षाही आयोजित करण्यासाठी काही कठोर नियमही जाहीर करण्यात आलेले आहेत. तर गेल्या 2 वर्षातील कोरोनाची परिस्थिती पाहता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काही बदलांसह विद्यार्थ्यांना काही प्रमाणात सूट दिली होती, पण मात्र आता हा नियम बदलून पूर्वीप्रमाणेच परीक्षा पण घेण्याचा निर्णय बोर्डाने ठोक पने घेतलेला आहे.

⚫काय आहेत बदल बघा तर board exam 2023?

यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा बंद करण्यात आलेल्या आहेत. शाळांनी home center यंत्रणा बंद केली आहे. २५ % कमी अभ्यासक्रम रद्द करून १००% अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात येणार आहे. तसेच उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्धा तासाचा अतिरिक्त(जास्त) वेळही रद्द करण्यात आला आहे. आणि यंदाच्या परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी पूर्णवेळ त्याच शाळेत उपस्थित राहणार आहेत. तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे विद्यार्थ्यांनी पालन केले पाहिजे. व अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. एवढेच नाही तर पुन्हा विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात येणार आहे. आणि नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.

Leave a Comment