बृहन्मुंबई महानगरपालिका महाभरती लगेचच होणार !!आजच आहे अर्जाची अंतिम तारीख!!Apply Now!Brihanmumbai Municipal Corporation Mahabharti

लवकरच बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ठाणे या महानगरपालिकेमध्ये मेगा भरती होणार आहे.31526रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरतीचे अधिसूचना 19 एप्रिल 2023 पासून देण्यात आलेली आहे. आणि अधिसूचनेनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती विषयी सविस्तर माहिती आम्ही या लेखात दिलेले आहे ही सर्व माहिती वाचल्यानंतर आवश्यकतेनुसार जाहिरात पाहू शकता आणि तसेच अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे.

उमेदवारांसाठी सूचना:

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ ग्रंथपाल संवर्गातील 02 रिक्तपदे सरळसेवेने पदे भरण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पध्दतीने (प्रत्येक 29 दिवसांच्या कालावधीनंतर 1 दिवसाचा सेवाखंड देवून) भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज www.portal.mcgm.govया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

⭐पदाचे नाव कनिष्ठ= ग्रंथपाल

✍️शैक्षणिक अर्हताः-

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधारक (बी. ए. / बी. कॉम. / बी. एस. सी.) व ग्रंथालय विषयातील पदवीधारक (बी. एल. आय. एस. सी. किंवा एम. एल. आय. एम. सी.) असणे आवश्यक आहे.

💁‍♀️अनु क्र. पदवी आणि आवश्यक गुण

१. बी. ए. बी. कॉम / बी. एस. सी.
आवश्यक गुण=किमान 55%

💁‍♀️प्राधान्य देण्यात येणाऱ्या विद्यापीठाचे अनुक्रमे नाव पुढीप्रमाणे
१) मुंबई विद्यापीठ
२) एस. एन. डि.टि.
३)इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठ

२) बी. एल. आय.एस. सी.
आवश्यक गुण=किमान 55%
💁‍♀️प्राधान्य देण्यात येणाऱ्या विद्यापीठाचे अनुक्रमे नाव पुढीप्रमाणे
(१) मुंबई विद्यापीठ
(२) एस.एन.डि.टि.
(३) ईदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठ
(४) यशवंतराव चव्हाण विद्यापीठ
(५) शिवाजी विद्यापीठ

३)एम. एल. आय. एम. मी.
⭐उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
प्राधान्य देण्यात येणाऱ्या विद्यापीठाचे अनुक्रमे नाव पुढीप्रमाणे
१) मुंबई विद्यापीठ
२) एस. एन. डि.टि.
३) इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठ
४) यशवंतराव चव्हाण विद्यापीठ
५) शिवाजी विद्यापीठ

सदर पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. 291/- + 18% जीएसटी एकूण रु.345/- = इतके शुल्क लो. टि.म.म. रुग्णालयाच्या रोखपाल विभागात दि. 28.04.2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत (शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भरून त्याची पावती अर्जासोबत जोडून अर्ज लो. टि.म.न. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात सादर करावा.

⭐सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे की, शैक्षणिक (गुणपत्रिका व प्रमाणपत्रे),

(i) एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र,

(ii) इंग्रजी टायपींग ३०wpm परीक्षा उत्तीर्ण

(iii) मराठी टायपींग ३owpm परीक्षा उत्तीर्ण, इत्यादीच्या प्रमाणित प्रतीलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

(iv) मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ ग्रंथपाल पदाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

सदर नियुक्ती कंत्राटी तत्त्वावर एका वेळी एक महिन्यापेक्षा जास्त नाही. इतक्या कालावधीकरीता प्रत्येक २९ दिवसाच्या कालावधी नंतर एक दिवस सेवा खंड देऊन पुनर्नेमणूक अथवा सरळसेवेद्वारे अर्हताधारक उमेदवार उपलब्ध होईपर्यंत यापैकी जे अगोदर होईल अशा स्वरुपात करण्यांत येईल.

🙎वयाची अट:-

वय १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा अधिक नसावे आणि मागासवर्गीयांकरीता 43 वर्षापेक्षा अधिक नसावे.

💁‍♀️सर्वसाधारण अटी –

 1. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्च स्तर किंवा निम्न स्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 2. उमेदवाराने संगणकाचे ज्ञान किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MSCIT OR GECT चे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
 3. उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करु शकतात. उमेदवाराने अर्जावर पासपोर्ट आकाराचा फोटो लावावा व त्यावर त्याने उपलब्ध जागेत स्वाक्षरी करावी..
 4. उमेदवाराने पदविका (पदवी परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास ती परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण केली याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 5. उमेदवाराला कोणत्याही न्यायालयात नैतिक अधःपतन किंवा फौजदारी स्वरुपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास, • तसेच उमेदवाराविरुध्द पोलिस चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास / शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.
 6. निवडप्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती / प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियुक्ती झालेली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
 7. उमेदवार नोकरी करीत असल्यास पूर्वीच्या नियुक्तीचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे,
 8. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना आहेत.
 9. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल..
 10. निवड झालेल्या उमेदवारांस रुपये 500/- च्या बंधपत्रावर विहित नमुन्यातील कंत्राट करार करणे

आवश्यक असून सदरहू खर्च संबंधित उमेदवारास करावा लागेल.

 1. निवड झालेल्या उमेदवाराविरुध्द कोणताही गुन्हा नोंदविला नाही अथवा सिध्द झालेला नाही असे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधित पोलीस स्टेशनकडून नेमणुकीनंतर एक महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहील.
 2. सदर कंत्राटी तत्वावरील पदधारकांची नियुक्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचना न देता रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना आहेत.
 3. सदर कंत्राटी तत्वावरील पदधारकाच्या नियुक्ती कालावधीमध्ये उमेदवाराने शिस्तभंग केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
 4. कुठल्याही कारणास्तव निवड झालेल्या उमेदवाराम पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने 30 दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे.
 5. कंत्राटी कनिष्ठ ग्रंथपाल याला दरमहा एकूण रु. 25,000/- एवढे निश्चित वेतन मिळेल. या वेतना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता इत्यादी अनुज्ञेय असणार नाही. सदर वेतनातून व्यवसाय कर वजावट करण्यात येईल,
 6. उपरोक्त पदाची कंत्राट तत्वावर नियुक्ती 29 दिवसांपेक्षा जास्त नाही, अशा प्रकारे करण्यात येईल. सदर कालावधीत नियमित तत्त्वावर कनिष्ठ ग्रंथपाल संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात आल्यास, सदर कंत्राटी कर्मचा-याची नेमणूक / सेवा समाप्त करण्यात येईल.
 7. सदर उमेदवाराला ग्रंथालयाच्या वेळेच्या अनुषंगाने काम करावे लागेल. सदर उमेदवाराची कामाची वेळ 2 पाळ्यांमध्ये म्हणजेच सकाळी 8.30 ते दुपारी 3.30 किंवा दुपारी 1.00 ते रात्री 8.00 पर्यंत असेल,
 8. उमेदवारास नियुक्त केलेल्या विभागातील सत्रांनुसार सामाहिक रजा अनुज्ञेय असेल, त्या व्यतिरिक्त कंत्राटी कर्मचा-यांना लागू असणा-या प्रचलित नियमानुसार नैमितिक रजा अनुज्ञेय असतील.
 9. त्यांची नेमणूक करार पध्दतीची असल्यामुळे त्यांना कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही.
 10. बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा नियमावलीनुसार ही नेमणूक झाली नसल्यामुळे त्या अनुषंगाने मिळणारे निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी अथवा तत्सम कोणत्याही प्रकारचे लाभ मिळण्यास ते पात्र राहणार नाहीत.
 11. ते दररोज नियमाने हजेरी पटावर त्यांच्या कर्तव्याच्या वेळेनुसार स्वाक्षरी करतील अन्यथा त्यांना गैरहजर धरण्यात येईल. त्यांची बिना परवानगी गैरहजेरी बिना वेतनी गैरहजेरी करण्यात येईल.

विशेष सूचना –

(अ) यापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुस-या संस्थेला अर्ज विकणे, स्विकारणे इत्यादींचा अधिकार दिलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.

ब) सविस्तर सूचना, बाबाबतच्या अटी व शर्ती, मनपाच्या संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी त्याचे बारकाईने अवलोकन करून संकेतस्थळावर प्रसारीत केलेल्या अर्जाच्या तसेच वैयक्तीक माहितीपत्राच्या नमुन्यामध्ये अर्ज करावा. अर्जाचे विहित शुल्क भरून त्याची पावती

जोडल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही..

क) टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी दखल घ्यावी.

आम्हाला खात्री आहे की ,या भरती विषयीच्या तुमच्या सर्व शंका
दूर झाले असतील आणि ही सर्व माहिती तुमच्यासाठी खूप खूप उपयोगाचे ठरणार आहे.

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

👉व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

👉टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

1 thought on “बृहन्मुंबई महानगरपालिका महाभरती लगेचच होणार !!आजच आहे अर्जाची अंतिम तारीख!!Apply Now!Brihanmumbai Municipal Corporation Mahabharti”

Leave a Comment