Free Ration 2023: रेशन कार्ड या धारकांची लागली लॉटरी ! आता फ्रीमध्ये मिळणार ‘इतक्या’ वस्तू ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

FREE RATION 2023👇👇👇

Free Ration 2023: नवीन वर्षात आपल्या केंद्र सरकारने फ्री रेशन योजनाचा लाभ घेणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच तुम्ही देखील फ्री रेशन योजनाचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे आम्ही तुम्हाला सांगतो सरकारच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2023 पासून रेशन कार्डधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशनचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि हे रेशन सर्व लाभार्थ्यांना संपूर्ण वर्षासाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2023 पर्यंत अखंडितपणे दिले जाईल. तसेच यासाठी तुम्हाला रेशन डीलरला एक रुपयाही देण्याची गरज नाही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत देशातील सुमारे 81 कोटी लोक हे मोफत रेशन योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत भारतातील नागरिकांना गहू, हरभरा, तांदूळ फ्रीमध्ये दिला जातो.

अन्न आणि पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबर 2022 मधील अन्नधान्यानुसार व डिसेंबर 2023 पर्यंत मोफत रेशनची तरतूद करण्यात आली आहे. तसेच त्याचबरोबर अन्नधान्य संपल्यावर मोफत सेवा बंद करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. पण मात्र, डिसेंबर 2023 पर्यंत सरकारनेच मोफत रेशन देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा या कायद्यांतर्गत, 2023 या वर्षात 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देण्याची तरतूद आहे.

तसेच सर्व राज्य अन्न महामंडळांचे महाव्यवस्थापक प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनाचा संपूर्ण अहवाल व केंद्र सरकारला सुपूर्द करतील. व म्हणजेच गरीब कल्याण योजनेचे संपूर्ण निरीक्षण केंद्र सरकार करणार आहे. आणि आम्ही तुम्हाला सांगतो की या योजनेचा लाभ आपल्या देशातील सर्व 5.33 लाख सरकारी दुकानांवर उपलब्ध होईल.

आणि त्याचबरोबर रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा देशभरात उपलब्ध होणार आहे. रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा अनेक राज्यांमध्ये सुरू झाली आहे. गरीब कल्याण अंतर्गत आपल्या संपूर्ण देशात फक्त एका रेशनकार्डमुळे रेशन उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. व यासाठी तुम्हाला लोकेशन बदलल्यावर रेशन कार्ड बदलण्याची गरज नाही.

Leave a Comment