100 jodakshar in marathi – जोडाक्षरे 100 –
मराठी जोडशब्द pdf – Jodakshar in Marathi examples – ची जोडाक्षरे – जोडाक्षर शब्द 50 –
व्यंजन म्हणजे काय – 50 jodakshar in marathi –
जोडशब्द म्हणजे काय – मराठी जोडशब्द यादी – Jodakshar in marathi pdf.
Table of Contents
जोडाक्षरांचे लेखन – Jodakshar In Marathi
मराठीच्या वर्णमालेचा अभ्यास आपण केला. स्वर, व्यंजन म्हणजे काय ते आपण पाहिले. त्यांचा उच्चार कसा करावयाचा, वर्णांची उच्चारस्थाने, वर्णांचे प्रकार यांचाही अभ्यास आपण केला. स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत. उदा. अ, आ. इत्यादी व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची आहेत. उदा. क्, ख्, ट् इत्यादी. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर निर्माण होतो. हे आपण स्वरांच्या अभ्यासाचे वेळी पाहिले. उदा. अ + इ = ए. दोन व्यंजने एकत्र आली की त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात.
उदा. म् + इ = म्ह, त् + य = त्य,
एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की, त्या संयुक्त व्यंजनाला द्वित्त असे म्हणतात. उदा. क् + क् क्क्, त् + त् = त्त् अशा संयुक्त व्यंजनाच्या शेवटी स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होते. म् + इ = म्ह, द् + य = दय्, श् + च = श्च् ही संयुक्त व्यंजने ह् आहेत. त्यामध्ये स्वर मिसळला की जोडाक्षर तयार होते. म् + ह् + अ =
म्ह, द् + य् + अ = दय, श् + च् + अ = श्च. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर असे म्हणतात. ज्या क्रमाने व्यंजने व स्वर एकत्र येतात त्याप्रमाणे त्यांचा आपण उच्चार करावयाचा असतो. किंवा ज्या क्रमाने आपण उच्चार करतो त्याप्रमाणे जोडाक्षराचे लेखन करावयाचे असते. पुढील शब्दांत आलेली जोडाक्षरे पहा व त्यांची फोड पहा.
शब्द | जोडाक्षर | फोड |
विद्यालय | द्या | द् + य्+ आ |
पश्चिम | श्चि | श् + च् + इ |
आम्ही | म्ही | म् + ह् + ई |
शत्रू | त्रू | त् + र + ऊ |
जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे व्यंजन हे अपूर्ण उच्चारले जाते. हे लक्षात घेऊन जोडाक्षराचे लेखन केले जाते. उदा. ‘विघ्न’ या शब्दात ‘घन’ हे जोडाक्षर आहे. त्यातील ‘घ्’ चा उच्चार अपूर्ण होतो. त्याचे लेखन अर्धा घ् असे केले जाते.
विद्या | ह्यांच्या | होत्या |
त्यांच्या | तिच्या | त्याला |
जोड्या | प्याला | उड्या |
मुख्य | संध्या | लाह्या |
खोड्या | माझ्या | चौथ्या |
थोड्या | तुझ्या | त्याच्या |
वड्या | सैन्य | मोठ्या |
त्याने | भाज्या | धान्य |
कल्पना | मनुष्य | कल्याण |
सोन्याच्या | नफ्यात | गिरण्या |
घड्याळ | अभ्यास | प्यायला |
वरच्या | व्यापारी | व्यायाम |
धनुष्य | गळ्यात | झेंढ्याचे |
साईच्या | न्यायला | पाण्यात |
वाघाच्या | तुमच्या | घ्यायला |
मळ्यात | थव्याने | आमच्या |
किल्ला | पट्टा | कच्चा |
घट्ट | रस्सा | गप्पा |
अन्न | लठ्ठ | खड्डा |
गड्डा | संख्या | पत्ता |
हत्ती | इश्श | धक्का |
पक्का | पट्टी | गट्टी |
हल्ला | दिल्ली | पन्नास |
अक्कल | गंमत | दुप्पट |
बद्दल | मुद्दाम | अत्तर |
जिन्नस | विठ्ठल | शिल्लक |
इयत्ता | डुक्कर | टक्कर |
नक्कीच | उत्तर | नकल |
उत्तम | उत्पन्न | बहाद्दर |
अद्यायत | पक्क्या | किल्यात |
मठ्ठ | व्हावे | जेव्हा |
आम्ही | केव्हा | तान्हा |
तिन्ही | न्हावी | जिल्हा |
जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती – jod shabd In Marathi
जोडाक्षरे लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत.
(१) आडवी जोडणी – एकापुढे एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला आडवी जोडणी असे म्हणतात. उदा. क् + क् + अ = क्क, क् + त् + जी = क्ती, – =
(२) उभी जोडणी – एका खाली एक वर्ण लिहून जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धतीला उभी जोडणी असे म्हणतात. उदाहरणार्थ,
जोडाक्षरे | आडवी जोडणी | उभी जोडणी |
क् + क् + अ = क्क | बक्कल, अक्कल | बक्कल, अक्कल |
क् + व् + अ = क्व | क्वचित, पक्व | क्वचित, पक्व |
फ् + फ् + अ = फ्फ | लफ्फा | लफ्फा |
जोडाक्षरांचे प्रकार – Types Jodakshar In Marathi
व्यंजनांच्या लेखनपद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात. पुढे काही उदाहरणे दिली आहेत.
(३) दीर्घान्तापूर्वीचे स्वर हस्व उच्चारले जातात. उदा. मुळा, मासा, विटी, कुहू, खेडी, पैसा, नौका.
(४) संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या (तत्सम) शब्दांतील अन्त्य ‘अ’ हा पूर्णोच्चारित असतो. उदा. गुण, विषय, मंदिर, सुर, गृह, नृप, निर्झर.
(५) जोडाक्षर, अनुस्वार व विसर्ग यानंतरचा ‘अ’ तोडका किंवा निभृत नसतो. उदा. डिंक, चिंच, भिंत, शिस्त, गुच्छ, शिल्लक, दुःख, निःसंशय
अनुस्वाराचे उच्चार
अनुस्वाराचे किंवा बिंदूचे उच्चार दोन आहेत : (१) खणखणीत व (२) ओझरता. खणखणीत उच्चारास ‘अनुस्वार’ असे म्हणतात आणि ओझरत्या उच्चारास ‘अनुनासिक’ असे म्हणतात.
(१) मराठीत अनुस्वाराचा उच्चार खणखणीत होतो. उदा. घंटा, तंटा, आंबा, चिंच, गुंड. >
(२) अनुस्वार : पुढे पहिल्या पाच वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्याच वर्गातील शेवटच्या अनुनासिकासारखा (ङ्, ञ्, ण, न्, म्) म्हणजे पंचमवर्णासारखा होतो.
शंकर (शङ्कर), चंचल (चञ्चल), घंटा (घण्टा), भिंत (भिन्त), शिंपला (शिम्पला) 2
(३) अनुस्वारापुढे ‘य’ व ‘ल’ आल्यास त्याचा उच्चार अनुनासिक य (य) किंवा अनुनासिक ल (लँ) किंवा व (क्) सारखा होतो. संयम (संय्यम), संलग्न (संल्लग्न किंवा संव्लग्न)
(४) अनुस्वारापुढे ‘र’, ‘व’, ‘श’, ‘घ’, ‘स’, ‘ह’ ही अक्षरे आल्यास ते अनुनासिक ‘व’ युक्त वँ बनते. उदा. संरक्षण (संवक्षण), संवाद (सव्वाद), संशय (संव्शय), संसार (संव्सार), सिंह (सिंव्ह), संज्ञा (संज्ञा) विसर्गाचा उच्चार
विसर्गाचा उच्चार
विसर्गाचा उच्चार त्याच्या मागील स्वरामागोमाग ह्कार युक्त होतो. उदा. दुःख (दुह्ख), अंत:करण (अंतकरण) इतर – जोडाक्षरापूर्वी हस्व स्वरावर आघात आल्यास तो स्वर दीर्घ उच्चारला जातो.
उदा. शिष्य, रस्ता, मुद्दा, विठ्ठल. परंतु, तसा आघात येत नसल्यास तो हस्वच उच्चारला जातो. उदा. वहाड, उद्या, तुझ्या, पुणे + स = पुण्यास.
आपले उच्चार बिनचूक यावेत यासाठी विदयार्थ्यांनी काळजी घ्यावी. आपल्या अध्यापकांकडून ते समजून घ्यावेत. वर्णांचे शुद्ध उच्चार करण्यासाठी ते शिकण्यासाठी अवधानपूर्वक श्रवण, अनुकरण व अध्यापकांकडून ते प्रत्यक्ष समजून घेणे आवश्यक आहे. श्रवणाच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकणे, थोर व्यक्तींच्या अभिवाचनाच्या व भाषणाच्या ध्वनिफिती ऐकणे या गोष्टी सहेतुक केल्या पाहिजेत.
हस्व स्वराऐवजी दीर्घ स्वराचा उच्चार केल्यास शब्दांच्या अर्थात फरक पडण्याचा संभव असतो. अशा काही शब्दांची सूची पुढीलप्रमाणे आहे:
दिन (दिवस), दीन (गरीब) सुत (मुलगा), सूत (धागा) सलिल (पाणी), सलील (लीलेने) सुर (देव), सूर (आवाज) शिर (डोके), शीर (रक्तवाहिनी) मिलन (भेट), मीलन (मिटणे) >
हे पण वाचा >>
स्वयंअध्ययन
(१) वर्ण म्हणजे काय? वर्णांचे प्रकार स्पष्ट करा.
(२) स्वर व व्यंजन यांतील फरक स्पष्ट करा.
(३) अनुस्वार व स्वरादी यांतील फरक स्पष्ट करा.
(४) संयुक्त व्यंजन व जोडाक्षर यांतील फरक सोदाहरण स्पष्ट करा.
(५) सजातीय स्वर व विजातीय स्वर कशास म्हणतात.
(६) ‘कृष्ण’ या शब्दातील वर्णरचना क् + ऋ + ष् + ण् + अ
अशी आहे. खालील शब्दांतील वर्णरचना लिहून दाखवा. धृतराष्ट्र, श्रीराम, प्रावीण्य, शिल्पकार
(७) खालील शब्दांतील जाड टाइपात छापलेले अक्षर तालव्य की
दंततालव्य ते लिहा. चावडी, चपला, चौकट, चिवडा, चिता, जास्त, झकास, मिजास, छत्री, झोप, झेप
F A Q S
Q. जोडाक्षरे म्हणजे काय ?
Ans : देवनागरी लिपीतील जोडाक्षरे व ती लिहिण्याचे प्रकार
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यांत एक स्वर मिसळतो त्यास ‘जोडाक्षर’ जोडशब्द असे म्हणतात. जसे : 1) विद्या 2) ह्यांच्या 3) होत्या 4)तिच्या 5) त्याला.
Q. मराठी जोडाक्षर उदाहरण सांगा ?
Ans : 100+ मराठी जोडाक्षरे यातील काही उदाहरणे
जोड्या 2. प्याला 3. उड्या 4.मुख्य 5. संध्या 6. लाह्या 7. खोड्या 7. माझ्या 8. त्याला 9.चौथ्या 10. थोड्या
Q. जोडाक्षर युक्त वाक्य
Ans : 1. कर्जबाजारी होऊ नका
गुरुजी वर्गात आले
तुम्हाला 100 + मराठी जोडाक्षरे – Jodakshar In Marathi – जोडाक्षर शब्द (जोडाक्षरांचे लेखन) नक्कीच आवडले असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.org ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला मराठी जोडशब्द व अर्थ | jodshabda in marathi | jod shabd in marathi 100+ मराठी व्याकरण हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.