New Education Policy 2022 :

१. बोर्डाच्या परीक्षांचं महत्त्व कमी होणार New Education Policy 2022…..

•नवीन (NEW) शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आलेले आहेत.

शालेय शिक्षणाचं स्वरुप आतापर्यंत 10+2 असे होते. मात्र या शैक्षणिक मसुद्यात दहावीची परीक्षा ही बोर्डाची परिक्षा असेल असा उल्लेख करण्यात आलेला नाही.
• त्याऐवजी 5+3+3+4 ही एक नवीन शिक्षण प्रणाली सुचवण्यात आलेली आहे.

•तसेच यानुसार पहिल्या टप्प्यात म्हणजेच पहिल्या पाच वर्षात – पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि तसेच इयत्ता पहिली ते दुसरीचे शिक्षण देण्यात येईल…

दुसऱ्या टप्प्यात – इयत्ता तिसरी ते पाचवी या वर्गा पर्यंतचे शिक्षण असेल.
•तिसऱ्या टप्प्यात – सहावी ते आठवी पर्यंत या वर्गाना शिकवण्यात येईल.
•चौथ्या टप्प्यात – तर उर्वरित चार वर्ष म्हणजेच नववी ते बारावी पर्यंतचं शिक्षण असेल.

•तसेच यामध्ये बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतली जाणार आहे. सेमिस्टर व पॅटर्न •मध्ये ही परीक्षा असणार आहे, तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार चालू आहे.

  1. NCERTअभ्यासक्रम ठरवणार …

•तसेच शिक्षण व्यवस्थेत पहिल्यांदाच पूर्व प्राथमिक शाळेसाठी अभ्यासक्रम ठरवला जाणार आहे. देशातील सर्वच पूर्व प्राथमिक शाळांना हा अभ्यासक्रम लागू असणार असेल. NCERT हा ठरवणार आहे अभ्यासक्रम .

•तिसरी पर्यंत विद्यार्थ्यांना वाचता येईल याच्यावर अधिक भर दिला जाणार आहे. संख्या आणि अक्षर ओळख हे यापुढे मुलभूत शिक्षण मानले जाणार आहे.
•तसेच नवीन शैक्षणिक धोरणा नुसार पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृ भाषेतून देण्यास अनुमती (प्राधान्य) देण्यात येईल.

  1. व्होकेशनल (HOCATIONAL)अभ्यासक्रमावर भर

•तसेच नववी ते बारावीमध्ये शिक्षणासाठी कोणतीही एक शाखा नसेल . तर विद्यार्थ्यांना विविध विषय निवडण्याची संधीही असणार आहे. उदा- विज्ञान विषय शिकत असताना संगीत, बेकरी असे बरेच विषय अभ्यासासाठी निवडता येतील.

•विज्ञान, वाणिज्य, कला यासोबतच संगीत, स्पोर्ट्स, लोक कला हे अभ्यासाचे विषय म्हणून विद्यार्थ्यांना निवडता येणार आहेत.
•सहावी पासून व्होकेशनल (HOCATIONAL)अभ्यासक्रम शिकता येणार आहे. यामध्ये कारपेंटर, लाँड्री, क्राफ्ट अशा बऱ्याच विषयासाठी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच करता येईल.

  1. तसेच शालेय रिपोर्ट कार्ड बदलणार….

•पहिली ते बारावीमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांच्या रिपोर्ट कार्डवर म्हणजेच निकाल पत्रावर(certificate) गुण, ग्रेड आणि शिक्षकांचा शेरा याचा उल्लेख असतो.

•आता या रिपोर्ट कार्डमध्ये विद्यार्थी, वर्गमित्र व शिक्षक यांचाही शेरा असणार आहे. शिक्षणा व्यतिरिक्त विद्यार्थी काय शिकला याचाही उल्लेख त्यांना करायचा आहे.
•बारावीमध्ये विद्यार्थी शाळे बाहेर पडताना त्याला बारा वर्षांचं रिपोर्ट कार्ड देण्यात येणार आहे.

  1. उच्च शिक्षणामध्ये मोठे बदल….👇

•महाविद्यालयीन शिक्षणात कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा तीन शाखांचा समावेश प्रवेश प्रक्रियेत आहेत. पण नवीन मसुद्यानुसार कला व विज्ञान या शाखां मधले काही विषय निवडून विद्यार्थ्यांना पदवीचं शिक्षण घेता येणार आहेत.
•यामध्ये मानवी education शिक्षण, science विज्ञान, art कला, sports स्पोर्ट्स, वोकेशनल कोर्स असे पर्याय असतील.
ज्या विद्यार्थ्यांना अनेक विषयांमध्ये रुची किंवा रस असतो. त्यांच्यासाठी हा पर्याय देण्यात आलेला आहे. (Example) •उदाहरणार्थ- महाविद्यालयात शिकत असताना इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याला संगीत (subject) विषय शिकता येईल.

  1. संपूर्ण देशात उच्च शिक्षण नियामकच New Education Policy 2022…

•देशात 45 हजाराहून जास्त (अधिक )महाविद्यालय आहेत. त्यांना(grade) ग्रेड देण्यासाठी उच्च शिक्षण नियामक अशी एकच संस्था स्थापन करण्यात येईल.

•पाली, पर्शियन व प्राकृत भाषेसाठी विशेष सोय- स्वतंत्र संस्था उभी केली जाणार आहे.

•एमफीलची डिग्री न मिळवता पीएचडी करता येणार.
ई-कोर्सेस कमीत कमी (८)आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणार.

Leave a Comment