Police Bharti 2023:पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

Police Bharti 2023:पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो आजची आनंदाची बातमी म्हणजेच पोलिस भरतीची तयारी करत असणाऱ्या किंवा भरतीची तयारी ज्या विद्यार्थ्यांना सुरू करायची आहे. अशा विद्यार्थ्यांना 6,000 रूपये मिळणार आहे. पोलीस भरतीचा २०२३ चा पहिला टप्पा पार पडला आहे. आणि दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरतीची जाहिरात लवकरच निघणार आहे.पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आणि तसेच जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.या योजनेचा लाभ मुलगा किंवा मुलगी कुणालाही घेता येणार आहे.

सर्व अटी तसेच वयोमर्यादा विषयी माहिती:

जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. आणि तसेच दुसरी अट म्हणजेच बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर तुमचे वय 18 ते 25 वर्ष आहे तर तुम्ही निश्चितच या योजनेसाठी अर्ज करायला पात्र आहात. या योजनेअंतर्गत तुम्हाला सहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिये विषयी माहिती:

या योजनेसाठी ऑनलाईन पोस्टाने किंवा ईमेल द्वारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तर तुम्हाला महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर
जाऊन Notice Board मधील पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

तसेच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच 27 ऑगस्ट 2023 पर्यंत तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.आधार कार्ड,रहिवासी दाखला,12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र,जातीचा प्रमाणपत्र,बँकेचे तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक) इत्यादी असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकचा संदर्भ घ्या.

भरतीची जाहिरात:येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा

आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा-येथे क्लिक करा 💚

Leave a Comment