संधी – स्वरसंधी | Sandhi In Marathi | Sandhi Swarsandhi – संधी म्हणजे काय

संधी म्हणजे काय – Sandhi Swarsandhi In Marathi

Sandhi In Marathi – आपण बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक असे उच्चारतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोडशब्द तयार होतो. उदाहरणार्थ, ‘सूर्य उदय झाला’ असे न म्हणता ‘सूर्योदय’ झाला असे आपण सहज बोलून जातो. ‘इति आदी’ न म्हणता आपण ‘इत्यादी’ असा शब्द बनवतो. ‘वाक् मय’ यांच्याऐवजी वाङ्मय’ असा एक शब्द तयार करून आपण बोलतो.

अशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात.

‘संधी’ म्हणजे सांधणे, जोडणे होय.

Sandhi In Marathi
Sandhi In Marathi

शब्दाची घडण व संधी

शब्दाची घडण कशी होते हे आपण पाहिले आहे. ‘ईश्वर’ या शब्दाची फोड पुढीलप्रमाणे होईल. –

ई + श् + व् + अ + र् + अ

‘इच्छा’ या शब्दाची फोड पुढीलप्रमाणे होईल.

‘इ + च् + छ् + आ.’

ईश्वर या शब्दाचा शेवटचा वर्ण ‘अ’ आहे. ‘इच्छा’ या शब्दाचा पहिला वर्ण’ई’ आहे.

ईश्वर + इच्छा असे दोन शब्द शेजारी आल्यावर ईश्वर या शब्दातील शेवटचा वर्ण ‘अ’ आणि इच्छा या शब्दातील पहिला वर्ण ‘इ’ एकमेकांमध्ये मिसळतात व जोडशब्द तयार होतो ‘ईश्वरेच्छा’. येथे अ + इ = ए असा संधी झाला. सूर्य + अस्त = सूर्यास्त, विदया + अर्थी = विदयार्थी अशी आणखी काही उदाहरणे देता येतील.

संधींचे प्रकार – Types Of Sandhi In Marathi

स्वरसंधी – एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर ने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात.

स्वर + स्वर असे त्यांचे स्वरूप असते. उदा. कवि + ईश्वर (इ ई = ई) कवीश्वर.

व्यंजनसंधी – जवळ जवळ येणाऱ्या या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला व्यंजनसंधी असे म्हणतात. व्यंजन + व्यंजन किंवा व्यंजन + स्वर असे त्याचे स्वरूप असते.

उदा. सत् + जन = (त् + ज्) = सज्जन,
चित् + आनंद = (त् + आ) = चिदानंद

विसर्गसंधी – एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा त्यास विसर्गसंधी असे म्हणतात. विसर्ग + व्यंजन किंवा विसर्ग + स्वर असे त्याचे स्वरूप असते. उदा. तपः + धन = तपोधन = (विसर्ग + ध्)
दु: + आत्मा = दुरात्मा = (विसर्ग + आ)

स्वरसंधी – आता आपण स्वरसंधींचा अभ्यास करू.

(१) पुढील शब्दांचे संधी पहा.

पोटशब्दएकत्र येणारे स्वर व संधीजोडशब्द
सूर्य + अस्तअ + अ = आसूर्यास्त
देव + आलयअ + आ = आदेवालय
विद्या + अर्थीआ + अ = आ विद्यार्थी
महिला + आश्रम आ + आ = आमहिलाश्रम
मुनि + इच्छाइ + इ = ईमुनीच्छा
गिरि + ईशइ + ई = ईगिरीश
मही + ईशई + ई = ईमहीश
गुरु + उपदेशउ + उ = ऊगुरुपदेश
भू + उद्धारऊ + उ = ऊभूद्धार

निरीक्षण – वरील शब्दांत, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर असून दुसऱ्या शब्दांतील पहिला वर्ण व्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर आहे. या दोहोंबद्दल तयार झालेला स्वर हा त्याच प्रकारातील दीर्घ स्वर आहे. .

यावरून निघणारा नियम असा –

नियम – हस्व स्वरापुढे किंवा दीर्घ स्वरापुढे तोच स्वर हस्व किंवा दीर्घ आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. यालाच सजातीय स्वरसंधी असे म्हणतात.

(२) आता आपण पुढील शब्दांचे संधी पाहूया –

पोटशब्दएकत्र येणारे स्वर व संधीजोडशब्द
ईश्वर + इच्छाअ + इ एईश्वरेच्छा
गण + ईशअ + ई एगणेश
उमा + ईशआ + ई = एउमेश
चंद्र + उदय अ + उ = ओ चंद्रोदय
महा + उत्सवआ + उ = ओमहोत्सव
देव + ऋषीअ + ऋ = अर्देवर्षी
महा + ऋषीआ + ऋ = अरमहर्षी

निरीक्षण – वरील शब्दांत, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर असून दुसऱ्या शब्दाचा पहिला स्वर हा दुसऱ्या प्रकारच्या स्वरांच्या हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर आहे. त्यातून, त्या दोहोंबद्दल येणारा स्वर पुढीलप्रमाणे आहे. .

अ + इ = ए, अ + ई = ए, आ + ई = ए, अ + उ = ओ, + उ = ओ, अ + ऋ = अर्, आ + ऋ = अर आ

यावरून निघणारा नियम असा –

नियम – अ किंवा आ यांच्यापुढे इ किंवा ई आल्यास त्या दोहोंऐवजी ‘ए’ येतो, अ किंवा आ यांच्यापुढे उ किंवा ऊ आल्यास ‘ओ’ येतो, आणि अ किंवा आ यांच्यापुढे ‘ऋ’ आल्यास त्या दोहोंऐवजी अर् येतो.

टीप – याला संस्कृतात गुण असे म्हणतात. तसेच एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे याला आदेश असे म्हणतात. अ किंवा आ या स्वरांपुढे इ, उ, ऋ (हस्व किंवा दीर्घ) आल्यास त्या वर्णांबद्दल अनुक्रमे ए, ओ, अर् असे वर्ण येणे याला गुणादेश असे म्हणतात.

(३) पुढील शब्दांचे संधी पहा.

पोटशब्दएकत्र येणारे स्वर व संधीजोडशब्द
एक + एकअ + ए = ऐएकैक
मत + ऐक्यअ + ऐ = ऐ मतैक्य
सदा + एवआ + ए = ऐसदैव
प्रजा + ऐक्यआ + ऐ = ऐप्रजैक्य
जल + ओघअ + ओ= औ जलौघ
गंगा + ओघआ + ओ = औगंगौघ
वृक्ष + औदार्यअ + ओ= औवृक्षौदार्य

निरीक्षण – वरील शब्दांत अ किंवा आ यांच्यापुढे ए, ऐ असे वर्ण आले असता ऐ हा स्वर तयार झाला आहे; तर अ किंवा आ या स्वरांपुढे ओ, औ असे स्वर आले असता औ असे स्वर तयार झालेले आहेत.

थोडक्यात, अ + ए = ऐ

आ + ओ = औ अ + औ = औ यावरून पुढील नियम निघतो.

नियम – अ किंवा आ यांच्यापुढे ए किंवा ऐ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल ऐ येतो आणि अ किंवा आ या स्वरापुढे ओ किंवा औ हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल औ हा स्वर येतो.

टीप – याला ‘वृद्ध्यादेश’ (वृद्धि + आदेश) असे म्हणतात.

(४) पुढील शब्दांचे संधी पहा.

पोटशब्दएकत्र येणारे स्वर व संधीजोडशब्द
प्रीती + अर्थइ + अ = य् + अ = यप्रीत्यर्थ
इति + आदीइ + आ = य् + आ = याइत्यादी
अति + उत्तमइ + उ = य् + उ = यु अत्युत्तम
प्रति + एम इ + ए = य् + ए = येप्रत्येक
मनु + अंतर उ + अ = व् + अ = व मन्वंतर
सु + अल्पउ + अ = व् + अ = व स्वल्प
पितृ + आज्ञा ऋ + आ = र् + आ = रा पित्राज्ञा

निरीक्षण – वरील शब्दांत इ, उ, ऋ यांच्यापुढे किंवा त्याच

प्रकारच्या दीर्घ स्वरांपुढे अ, उ, ए असे विजातीय स्वर आले आहेत व त्या दोहोंबद्दल म्हणजे इ, ई बद्दल ‘य’ हा वर्ण आला व त्यात पुढील स्वर मिसळला, तसेच उ, ऊ बद्दल ‘व’ हा वर्ण आला व त्यात पुढील स्वर मिसळला आणि क्र बद्दल र हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळला आहे.

थोडक्यात, इ + अ = य् + अ = य
इ + आ = य् + आ = या
इ + उ = य् + उ = यु
इ + ए = य् + ए = ये
उ + अ = व् + अ = व
ऋ + अ = र् + अ = र

यावरून पुढील नियम निघतो.

नियम – इ, उ, ऋ (हस्व किंवा दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास इ – ई बद्दल ‘य’ हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो, उ ऊ बद्दल ‘व’ हा वर्ण येऊन पुढील स्वर त्यात मिसळतो आणि ऋ बद्दल ‘र’ हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर मिसळतो व संधी होतो.

टीप – इ, उ, ऋ यांबद्दल अनुक्रमे य, व, र् असे आदेश होतात. त्यांना ‘यणादेश’ (यण् + आदेश) असे म्हणतात. य, व्, र यांच्याबद्दल अनुक्रमे इ, उ, ऋ आल्यास ‘संप्रसारण’ म्हणतात. उदा. येथे – इथे, नवनऊ, गायी – गाई, सोयी – सोई. –

पुढील शब्द पहा.

पोटशब्दएकत्र येणारे स्वर व संधीजोडशब्द
ने + अन ए + अ = अय् + अ = अयनयन
गै + अन ए + अ = आय् + अ = आयगायन
गो + ईश्वरओ + ई = अव् + ई = अवीगवीश्वर
नौ + एक औ + ई = आव् + इ = आविनाविक

नियम – येथे शब्दाच्या अखेरीस ए, ऐ, ओ, औ हे स्वर आहेत. दुसऱ्या शब्दाच्या प्रारंभीचे स्वर अ, ई हे आहेत. त्याबद्दल ‘अय’, ‘आय’, ‘अवी’, ‘आवि’ असे वर्ण येतात. उच्चार आणि संधिनियम यांचा परस्पर संबंध लक्षात घेतला तर, हे किती नैसर्गिक बदल आहेत हे लक्षात येईल. थोडक्यात, ए + अ = अय् + अ = अय

ऐ + अ = आय् + अ = आय
ओ + ई = अव् + ई = अवी
औ + इ = आव + इ = आवि

याबद्दलचा नियम असा :

ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्यांबद्दल अनुक्रमे, अय, आय, अवी, आवि असे आदेश होऊन पुढील स्वर त्यात मिसळतो.

इ, उ, ऋ (हस्व किंवा दीर्घ) यांना होणारे आदेश थोडक्यात पुढील तक्त्यात दिले आहेत.

स्वरदीर्घादेशगुणादेशवृद्ध्यादेशयणादेश
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋई, ऊए, ओ, अर्आ, ऐ, औ, आर्य, व, र

स्वयंअध्ययन

(१) संधी म्हणजे काय? संधी किती प्रकारचे आहेत, सोदाहरण स्पष्ट करा.

(२) पुढील शब्दांचे संधी करा. ज्या नियमांनुसार ते झाले आहेत ते नियम सांगा.

राष्ट्र + इतिहास, महा + उत्सव, अन्य + उक्ती, स्वभाव + अनुसार, स्वभाव + उक्ती, महा + ईश, गुरु + आज्ञा प्रश्न + उत्तर, मद + अंध, प्रति + अक्ष, कृपा + ओघ, अति + आचार, किती + एक, नदी + उद्गम, अति + उत्तम, क्षण + एक, विद्या + अमृत, जन + आदेश, राजा + आज्ञा, यमुना + ओघ, धन + आदेश, गुण + ईश, राजा + ईश, रमा + ईश.

हे पण वाचा >>

समानार्थी शब्द मराठी
विरुद्धार्थी शब्द मराठी
मराठी जोडाक्षरे
वर्णविचार मराठी
मराठी व्याकरण

FAQS – Sandhi In Marathi

संधी म्हणजे काय ?

उत्तर – संधी म्हणजे सांधने किंवा जोडणे होय.

संधी समानार्थी शब्द मराठी ?

उत्तर – जुळणी, योगायोग, करार

स्वर संधी चे उदाहरण ?

उत्तर – (पोटशब्द) मुख्य + आलय + (एकत्र येणारे स्वर) अ + आ (संधी) मुख्यालय

तुम्हाला संधी – स्वरसंधी | Sandhi In Marathi | Sandhi Swarsandhi – संधी म्हणजे काय – Sandhi Marathi Marathi Sandhi – संधी शब्द (मराठी व्याकरण) नक्कीच आवडले असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Org ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला संधी मराठी जोडशब्द व अर्थ | Sandhi in marathi | संधी व संधीचे प्रकार | मराठी व्याकरण | Marathi Grammar Sandhi हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment