दहावी बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक SSC HSC board exam time table 2024

SSC HSC board exam time table 2024

सरमिसळ पद्धतीमुळे कॉपीमुक्त परीक्षा:

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीची परीक्षा १ मार्चपासून तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

परीक्षा जिल्ह्यातील ११४ केंद्रांवर:

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा १७६ केंद्रांवर आणि बारावीची परीक्षा जिल्ह्यातील ११४ केंद्रांवर होणार आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारीत होणार आहे. तर लेखी परीक्षा पहिल्यांदा दहावीची सुरू होईल.SSC HSC board exam time table 2024

परीक्षेवर पथकाचा विशेष वॉच राहणार:

मागील परीक्षांचा अनुभव लक्षात घेऊन बोर्डाने विशेष पथकांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी बोर्डाच्या विशेष पथकाचा परीक्षेवर वॉच राहणार आहे. शाळांमध्येही बैठे पथके कार्यरत असणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी MSBSHSEकडून ठोस नियोजन केले जात आहे.10th 12th Time Table 2024

अनेक शाळांची चिंता वाढली:

दरवर्षी नेहमीप्रमाणे एका शाळेतील किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एकाच परीक्षा केंद्रांवर परीक्षा द्यायचे. पण, एकमेकांच्या ओळखीतून कॉपी प्रकार घडत असल्याची बाब निदर्शनास आली. या पार्श्वभूमीवर आता MSBSHSEने यंदा परीक्षेसाठी ‘सरमिसळ पद्धत’ अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच शाळेतील विद्यार्थी आता वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देतील. तीन किलोमीटर अंतरावरील परीक्षा केंद्रांवर या विद्यार्थ्यांचे क्रमांक येणार आहेत. त्यामुळे अनेक शाळांची चिंता वाढली असून काही शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रात बदल करण्याची मागणी केल्याचेही बोलले जात आहे. पण, बदल अशक्य असल्याने शाळांनी १०० टक्के निकालासाठी नोट्‌स देणे, सराव घेणे सुरू केले आहे.

🧾बोर्डचा पेपर फुटला लगेच बघा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. चिंता न करता आत्मविश्वास बाळगावा. मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करावा. महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव सतत करावा, त्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी.

हे पण वाचा

10th 12th time table pdf 2024

जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट 👉येथे क्लिक करा

साक्षर, संपन्न व समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment