तलाठी भरतीचा मार्ग मोकळा : अनुसूचित क्षेत्रात लोकसंख्येनुसार इतर प्रवर्गालाही संधी

talathi bharti 2023,talathi bharti jahirat 2023 24,
talathi bharti gov.in,talathi bharti 2023 in Marathi,
talathi bharti,talathi syllabus,talathi salary,
talathi bharti 2023 syllabus,talathi question paper,talathi bharti 2023 requirement ,

तलाठी भरतीचा मार्ग मोकळा : अनुसूचित क्षेत्रात लोकसंख्येनुसार इतर प्रवर्गालाही संधी

पुढील महिनाभरात पदभरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन:

सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील (पेस) जागांवरून असलेल्या वादावर अखेर शासनाने निर्णय घेत लेखी आदेशही जाहीर केला. यात अनुसूचित क्षेत्रात (पेसा) अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गालाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली असून पुढील महिनाभरात राज्यातील रिक्त असलेली ४ हजार १२२ तलाठी पदे भरली जातील.

👇👇👇👇👇👇👇

MahaForest Bharti 2023-वनविभागातील गट क रिक्त पदांवर भरती होणार, शासनाचा मोठा निर्णय!Apply Now!!

पेसा क्षेत्रात सर्वच तलाठी पदे ही अनुसूचित जमाती या प्रवर्गातून भरावयाची असा राज्यापालांचा यापूर्वीचा आदेश होता. त्यानुसार राज्यातील तब्बल ११ जिल्हे हे पेसा क्षेत्रात येत असल्याने या सर्व जिल्ह्यात सरसकटपणे अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातूनच शासकीय विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, शिक्षक अशी विविध पदांची भरती करण्यात येणार
होती. परंतु, अनेक जिल्ह्यांत आदिवासींसह इतरही प्रवर्गाची लोकसंख्या असल्याने हा त्या लोकसंख्येवर अन्याय होता. त्याविरोधात तीव्र आक्षेप नोंदविण्यात आले.

त्याचीच दखल घेत या निर्णयात बदल करण्याची मागणी झाल्यानंतर २०१९ साली राज्यपालांनी त्याबाबत अध्यादेशही दिले होते. यात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पदभरती करण्याबाबत अनुमती देण्यात आली. परंतु, त्याबाबत शासन आदेशाची प्रतीक्षा होती. त्यामुळे तलाठी भरतीची डिसेंबरपूर्वीच घोषणा होऊन अन् एप्रिलपर्यंत भरती पूर्ण करण्याची घोषणाही तांत्रिक कारणामुळे हवेतच विरली.

अखेर २०२३ मध्ये प्रक्रिया सुरू झाली. पेसाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले. त्यात बिंदू नामावलीसह इतरही काही दुरुस्त्या आहेत का ? बिंदू नामावली प्रमाणे रिक्त पदे किती? रिक्त पदांमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांचे प्रमाण किती याची संपूर्ण माहिती विभागीय आयुक्तांकडून मागविण्यात आली होती.

त्यांच्याकडून अहवाल येणे प्रलंबित असल्यानेच भरतीबाबत घोषणा करूनही ती तत्काळ करणे शासनाला शक्य झाले नव्हते. ही रखडून पडलेली भरती आता नुकताच शासन निर्णय जाहीर झाल्याने लवकरच जात प्रवर्गानु नुसार तलाठी पदांची फेर संख्या निश्चित करून भरती पूर्ण करण्याचे सूतोवाच शासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तलाठीसह १७ संवर्गाच्या भरतीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

हे देखील वाचा 👇

BSNL Bharti 2023 : भारत संचार निगम लिमिटेड मेगाभरती | पात्रता फक्त 10वी पास ईथे करा अर्ज BSNL requirement 2023

आता सर्वसाधारणसह इतर प्रवर्गांच्या जागा वाढणार

आधी १३ आदिवासी जिल्ह्यांत १०० टक्के पदे एस.टीप्रवर्गातून भरली जाणार होती. त्यामुळे एकूण पदसंख्येतून ही पदे एसटी राखीव होती. परंतु, आता लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ही पदे भरली जातील. एस. टी. प्रवगांची लोकसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांत सर्वसाधारणसह एस.सी, ओबीसी वइतर घटकांच्या जागा वाढतील.

आदिवासी लोकसंख्येनुसार अशी होणार पदभरती:

■ ५० टक्क्यापेक्षा अधिक: एस.टी. प्रवर्गातूनच १०० टक्के तलाठी पदे भरणार

■२५ ते ५० टक्क्या दरम्यान आदिवासी लोकसंख्येसाठी : ५० टक्के पदांची संधी

■२५ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असल्यास २५ टक्के पदे भरणार

नोकरी विषयी आणि शैक्षणिक , योजना, शेतकरी सरकारी योजना या सर्व updates करीता आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

नाशिक जिल्ह्यातील पदे

  • एकूण पदे : १६
  • सर्वसाधारण: ५८
  • महिलांसाठी ३० टक्के आरक्षण : ४८
  • खेळाडू ५ टक्के आरक्षण : ०६
  • माजी सैनिक १५ टक्के आरक्षण : २४
  • प्रकल्पग्रस्त ५ टक्के आरक्षण: ०६
  • भूकंपग्रस्त २ टक्के आरक्षण : ०२
  • दिव्यांग ४ टक्के : ०६
  • पदवीधर अंशकालीन १० टक्के : १७

Leave a Comment