वर्णविचार – Varnvichar In Marathi

पुढील वाक्य वाचा.

मुलांनी खरे बोलावे.

हे एक वाक्य आहे. प्रत्येक विचार पूर्ण अर्थाचा असला की त्याला ‘वाक्य’ असे म्हणतात. एका किंवा अनेक शब्दांच्या समुच्चयाने आपला विचार आपण पूर्ण करतो. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय.

वरील वाक्यात तीन शब्द आहेत: (१) मुलांनी, (२) खरे, (३) बोलावे असे हे तीन शब्द आहेत. वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. वाक्य असे शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते.

‘मुलांनी’ या शब्दात तीन अक्षरे आहेत. (१) मु, (२) लां, (२) नी अशी ही तीन अक्षरे आहेत. विशिष्ट क्रमाने असलेल्या तीन अक्षरांच्या या समूहाला काही अर्थ आहे. ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या

समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात.

‘मुलांनी’ या शब्दाचा उच्चार करताना (१) मु, (२) लां, (३) नी हे तीन ध्वनी आपल्या तोंडून बाहेर पडतात. हे तीन ध्वनी आपण ‘मु. लां. नी.’ अशा तीन खुणांनी आपण लिहून दाखवतो. त्यांना आपण अक्षरे असे म्हणतो. अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत. म्हणून अक्षरांना ‘ध्वनिचिन्हे’ असे म्हणतात.

. ‘मुलांनी’ या शब्दात ‘मु’ हे अक्षर आहे. ते एक ध्वनिचिन्ह आहे. मु’ हा एक ध्वनी वाटत असला तरी तो मूलध्वनी नाही. ‘म्’ व ‘उ’ असे दोन मूलध्वनी एकत्र आलेले आपल्याला आढळतील. ‘म्’ व ‘उ’ हे दोन मूलध्वनी आहेत.

आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण ‘वर्ण’ असे म्हणतो. हे ध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात. ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो (आपण ते रंगाने’ म्हणजे वर्णाने’ लिहून ठेवतो म्हणून त्यांना ‘वर्ण’ असे म्हणतो) लिहून ठेवल्यामुळे हे ध्वनी नाश पावत नाहीत. ते कायम राहतात म्हणून त्यांना ‘अ-क्षर’ (नाश न पावणारे) असे म्हणतात. वर्णमाला

मराठी भाषेतील वर्णमाला पुढीलप्रमाणे आहे: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लु, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: क्, ख, ग, घ, ङ् च, छ, ज, झ, ञ् द, ठ, ड्, द, ण, त्, थ्, द्, ध्, न, प, फ, बू, भ, म्, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ.

वर्णाचे प्रकार

पडतात, त्यांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साहाय्यावाचून होतो. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले (= विवृत्त) असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते सूर.

(२) स्वरादी ‘अं’ व ‘अ’ या दोन वर्णाना स्वरादी असे म्हणतात. यात अनुस्वार (-) व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी’ असे म्हणतात.

स्वरादी म्हणजे स्वर आहे आदी म्हणजे आरंभ ज्याच्या असा’ वर्ण. उदाहरणार्थ : ‘अंगण’ या शब्दात अ + अनुस्वार = अं ‘शंकर’ या शब्दात श् + अ + अनुस्वार = शं +
‘किंकर’ या शब्दात क् + इ + अनुस्वार = किं
‘मन:स्थिती’ या शब्दात न् + अ + विसर्ग = नः
दुःख’ या शब्दात द् + उ + विसर्ग = दुः

अनुस्वार – अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द आहेत. उदा. गंगा, घंटा, आंबा, उंट, इंधन इ. काही वेळा अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट, ओझरता होतो. उदा. हं, देवांनी, घरांमध्ये. स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात तर ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात.

विसर्ग – विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय. विसर्गाचा उच्चार ह’ या वर्णाला थोडा हिसडा देऊन – केलेल्या उच्चारासारखा आहे.

(३) नवे स्वरादी – इंग्रजी भाषेचा संपर्क आल्यानंतर त्या भाषेचा प्रभाव आपल्या भाषेवर पडला. काही इंग्रजी शब्द मराठी भाषेत आले आणि रुळून गेले. उदा. बॅट, बॉल, ऑफिस, बॅग, ऑगस्ट, ऑक्टोबर, फॅशन इ. त्यामुळे ‘अँ’ व ‘आँ’ हे दोन स्वरादी मराठीमध्ये आले आहेत. त्यांचीही दखल घेऊया. –

(४) व्यंजन – मराठी वर्णमालेतील ‘क्, ख् ….. पासून ह, ळ पर्यंतचे वर्ण व्यंजने आहेत. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही, त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखविण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात. आपण जेव्हा क, ख, ग, असा उच्चार करतो तेव्हा त्यात ‘अ’ हा स्वर मिसळून आपण त्यांचा उच्चार करतो.

उदा. क् + अ = क. याचा अर्थ ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. अक्षरे – अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. अ, आ, इ, ई वगैरे स्वर पूर्ण उच्चारायचे आहेत.

क, ख, ग, घ् ही व्यंजने अपूर्ण उच्चारांची आहेत. त्यात अ मिसळून क, ख, ग, घ ही अक्षरे होतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात.

बाराखडी – व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते. प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ हे दहा स्वर व अं, अ: यांची चिन्हे मिळवून आपण बारा अक्षरे तयार करतो. त्यांना आपण ‘बाराक्षरी’ किंवा ‘बाराखडी’ असे म्हणतो. उदा.

वर्ण : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
बाराखडी : क का कि की कु कू के कै को कौ कं कः . T : ..

स्वरांचे प्रकार

(१) र्हस्व स्वर व दीर्घ स्वर – स्वरांचा उच्चार करताना लक्षात येते की, अ, इ, उ, ऋ, या स्वरांचा उच्चार आखूड होतो. त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो.

म्हणून त्यांना व्हस्व स्वर असे म्हणतात. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. त्यांचा उच्चार लांबट होतो. म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.

(२) संयुक्त स्वर – दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना ‘संयुक्त स्वर’ असे म्हणतात. ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. ते पुढीलप्रमाणे तयार झाले आहेत :

ए = अ + इ किंवा ई ऐ = आ + इ किंवा ई ओ = अ + उ किंवा ऊ औ = आ + उ किंवा ऊ

र्हस्व स्वर किंवा दीर्घ स्वर हे त्यांचा उच्चार करण्यास लागणाऱ्या कालावधीवरून ठरवितात, त्यांना मात्रा असे म्हणतात. हस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा मानतात. दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा लागतात.

(३) सजातीय स्वर व विजातीय स्वर – एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. उदा. –

अ-आ, इ – ई, उ – ऊ भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ – इ, अ – उ ,इ – ए , उ – ए, अ – ऋ

व्यंजनांचे प्रकार

(१) स्पर्श व्यंजने – ‘क्, ख्’ पासून ‘भ, म्’ पर्यंतच्या व्यंजनांना ‘ स्पर्श व्यंजने असे म्हणतात. त्यांचा उच्चार करताना फुफ्फुसांतील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, ताल, दात, ओठ यांच्याशी तिचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात.

(२) अनुनासिक – ङ्, अ, ण, न, म् या वर्णाचा उच्चार त्या त्या वर्णाच्या उच्चारस्थानाबरोबरच नासिकेतून म्हणजे नाकातूनही होतो म्हणून त्यांना ‘अनुनासिक’ वर्ण असे म्हणतात.

(३) कठोर व मृदू व्यंजने – जेथे उच्चाराची तीव्रता दिसून येते ती कठोर व्यंजने समजली जातात. तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य, कोमल किंवा मृदू होतो. त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. कठोर व्यंजने, मृदू व्यंजने व अनुनासिक यांचा तक्ता पुढीलप्रमाणे देता येईल.

(४) अर्धस्वर – य, र, ल, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ, उ, ऋ, लू या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखीच आहेत. संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात.

(१) इ + अ = य् + अ – (उदा. अति+अंत = अत्यंत) (२) ऋ + अ र् + अ (उदा. पितृ + अर्थ = पित्रर्थ) (३) लृ + अ किंवा आ = ल् + अ किंवा
(उदा. ल + आकृती = लाकृती)

(५) उष्मे – घर्षक – श्, ष, स यांना उष्मे म्हणतात किंवा घर्षक असे म्हणतात. उष्मन् = वायू. मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्याप्रमाणे या वर्णाचा उच्चार होतो. यात घर्षण आहे. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे म्हणतात.

(६) महाप्राण व अल्पप्राण व्यंजने ‘ह’ या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते. म्हणून

त्याला महाप्राण असे म्हणतात. अशा ‘ह’ मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात. उरलेल्या वर्णांना अल्पप्राण वर्ण म्हणतात.

श्, ष, स्, ह् यांचा उच्चारही वायूच्या घर्षणाने होतो. म्हणून त्यांनाही महाप्राण वर्ण असे म्हणतात. अशा रीतीने वरीलप्रमाणे १४ वर्ण महाप्राण मानले जातात व उरलेले अल्पप्राण मानले जातात.

‘ळ’ हा स्वतंत्र वर्ण मानला जातो.
‘क्ष’ व ‘ज्ञ’ ही जोडाक्षरे आहेत.

स्वयंअध्ययन

पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (१) स्वर म्हणजे काय? (२) व्यंजने म्हणजे काय? (३) वर्णांचे प्रकार सोदाहरण लिहा. (४) स्वरांचे प्रकार सोदाहरण लिहा. (५) व्यंजनांचे प्रकार सोदाहरण लिहा.

हे पण वाचा :

समानार्थी शब्द मराठी

विरुद्धार्थी शब्द मराठी

तुम्हाला हे आर्टिकल नक्कीच आवडले असेलच अशी मला खात्री आहे असेच मराठी आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या >>> maharashtraboardsolutions.org <<< वेबसाईट ला नक्की भेट द्या इथे तुम्हाला सर्व Questions Paper, Digest, maharashtra board solutions, Marathi Books, Maharashtra Board Textbook Solutions आणि आणखी या संबंधी सर्व माहिती मिळेल.

Leave a Comment