12 वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी ; 26 जानेवारी 2024 पर्यंत थेट येथे करा अर्ज! Vimantal Pradhikaran Bharti 2024

उमेदवारांसाठी विमानतळ प्राधिकरणात नोकरीची संधी

तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी मिळणे नेहमीच आनंदाची बाब असते. अशाच एका महत्त्वाच्या संधीची घोषणा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने केली आहे. 12वी पास उमेदवारांसाठी विमानतळ प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीची मुदत 26 जानेवारी 2024 पर्यंत आहे.

पद आणि शैक्षणिक पात्रता:

या भरतीमध्ये कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक अशा दोन महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.

कनिष्ठ सहाय्यक पदासाठी उमेदवार हा मान्यता प्राप्त बोर्डातून एचएससी म्हणजेच बारावी परीक्षा उत्तीर्ण असावा. अथवा उमेदवार दहावी पास असून त्याच्याकडे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, फायर क्षेत्रातील 03 वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण झालेला असावा.

वरिष्ठ सहाय्यक या पदाच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास यासाठी उमेदवाराकडे डिप्लोमा असावा ज्यात इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली कम्युनिकेशन, रेडिओ इंजिनिअरिंग यांपैकी कोणतीही एक ब्रांच असावी. बी कॉम पदवीधरांना देखील प्राधान्य मिळणार आहे.

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

वेतन आणि पगार:

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एक लाख रुपये एवढा आकर्षक पगार मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत:

या भरतीचा अर्ज करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जानेवारी 2024 असणार आहे.

उमेदवारांना असा करावा लागणार अर्ज:

अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर पाहायची आहे शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज करायचा आहे.

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लिअर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो सही व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून मगच अपलोड करायचे आहेत.

अर्ज करत असताना तुमचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट तुम्हाला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.

अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासपोर्ट व ईमेल आयडी लक्षात राहील असाच भरायचा आहे.

Leave a Comment